Namdev Gharal
तामिळनाडूतील किनारपट्टी भागात असलेल्या महाबलीपुरम येथे एक अवाढव्य गूढं दगड असून, घसरतीला असूनही गेली १२०० वर्षे जागेवरुन तूसभरही हललेला नाही
महाबलीपूरम (मामल्लापुरम) येथे एका टेकडीच्या तीव्र उतारावर हा भलामोठा गोल दगड उभा आहे. स्थानिक तमिळ भाषेत याला 'वान इरै कल' (Stone of Sky God ) म्हणतात
हिंदू पौराणिक कथेनुसार, बालकृष्णाला मटक्यातून लोणी चोरून खात असे. स्वर्गातून लोण्याचा गोळा खाली पडला आणि त्याचे रूपांतर या दगडात झाले, अशी स्थानिक लोककथा आहे. यामुळे याला 'कृष्णाचा लोण्याचा गोळा' Krishna's Butterball म्हणून ओळखले जाते.
विशाल आकार आणि वजन: हा ग्रॅनाइटचा दगड सुमारे २० फूट उंच, ५ मीटर रुंद आणि तब्बल २५० टन (सुमारे २.५ लाख किलो) वजनाचा आहे.
गुरुत्वाकर्षणाला आव्हान: हा महाकाय दगड सुमारे ४५ अंशांच्या तीव्र उतारावर केवळ एका छोट्याशा पृष्ठभागाच्या (सुमारे ४ फूट) टेकूवर उभा आहे. इतक्या तीव्र उतारावर असूनही तो कधीही खाली घसरलेला नाही.
१२०० वर्षांचा इतिहास: हा दगड किमान १२०० वर्षांहून अधिक काळापासून याच जागेवर स्थिर आहे. अनेक वादळे, त्सुनामी आणि तीव्र भूकंपाचे धक्के येऊनही हा दगड आपल्या जागेवरून इंचभरही हललेला नाही.
१९०८ मध्ये मद्रासचे तत्कालीन गव्हर्नर आर्थर हॅव्हलॉक यांनी सुरक्षेचा विचार करून ७ हत्तींच्या मदतीने हा दगड खेचण्याचा प्रयत्न केला, पण दगड जागचा हलला नाही.
भूगर्भशास्त्रज्ञांनुसार हा नैसर्गिकरीत्या तयार झालेला 'इरॅटिक' प्रकारचा खडकाचा भाग आहे.
दगडाचे वस्तुमान (Center of Gravity) आणि घर्षण (Friction) या उतारावर अशा प्रकारे संतुलित झाले आहे की, तो उतारावर असूनही स्थिर राहतो.
हा परिसर युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असून देश-विदेशातील पर्यटकांसाठी हे एक मोठे आकर्षण केंद्र आहे.