Namdev Gharal
आजकाला प्रत्येक घरांच्या किचनमधील एक महत्वाची व अन्न शिजवताना सर्रास वापरली जाणारी वस्तू म्हणजे प्रेशर कुकर
पण असा विचार केला आहे का की कोणतेही काम ‘प्रेशर’खाली केल्यानंतर ते काम व्यवस्थित होते का, यामुळे आर्युवेद म्हणते अन्न प्रेशर खाली शिजवणे योग्य नाही
प्रेशर कुकरचा शोध डेनिस पॅपिन (Denis Papin) या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि संशोधकाने १६७९ मध्ये लावला. नी या उपकरणाचे नाव 'स्टीम डायजेस्टर' (Steam Digester) असे ठेवले होते
वाफेच्या उच्च दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू (boiling point) वाढतो आणि अन्न वेगाने शिजते, हे तत्त्व त्यांनी या उपकरणाद्वारे पहिल्यांदा मांडले होते.
आजकालच्या फास्ट किंवा धावत्या युगात प्रेशर कुकर गरजेचा बनला आहे, जसे आर्युवेदानुसार या कुकरचे तोटे आहेत तसेच आधुनिक विज्ञानानुसार काही फायदेही आहेत
कुकरमध्ये उच्च वाफेच्या दाबाखाली अन्न कमी वेळात शिजते. त्यामुळे पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे (उदा. व्हिटॅमिन B आणि C) आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त वेळ उकळण्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात टिकून राहतात.
डाळी आणि धान्यांमध्ये असलेले 'फायटिक ॲसिड' (Phytic Acid) आणि 'लेक्टीन्स' (Lectins) यांसारखे पचनास अडथळा आणणारे घटक कुकरमधील उच्च तापमानामुळे सहज नष्ट होतात
आयुर्वेदानुसार ज्या अन्नाला शिजताना सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवेचा स्पर्श होतो, ते अन्न पचनासाठी हलके आणि शरीरासाठी 'सात्त्विक' बनते. कुकरमधील बंद वाफेमुळे अन्न जड होते.
डाळी किंवा भात उकळताना वर येणारा पांढरा फेस (युरिक ॲसिड आणि स्टार्चचा थर) कुकर बंद असल्यामुळे काढता येत नाही, तो अन्नातच मिसळतो.
त्यामुळे जरी आजच्या काळात भाड्यांत अन्न शिजवणे शक्य नसले तरी प्रेशर कुकर चा वापरही डाळी, कडधान्य अशा कठीण पदार्थांसाठीच करावा हिरव्या भाज्या कुकरमध्ये शिजवणे टाळावे!