स्वालिया न. शिकलगार
लोकप्रिय अभिनेत्री सारा खान आणि अभिनेता कृष पाठक लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेl
नुकत्याच झालेल्या हळद समारंभातील दोघांच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे
फोटोंमध्ये सारा आणि कृष दोघेही पारंपरिक वेशात दिसत आहेत
साराने पिवळ्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला असून कृषने साधा कुर्ता परिधान केला आहे
समारंभात कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्रांनी सहभागी होत नवदाम्पत्यावर प्रेमाचा वर्षाव केला
फोटोंमध्ये दोघांचे मस्तीभरे रोमँटिक पोझेस विशेष लक्ष वेधून घेत आहेत
सारा खानने बिदाई, ससुराल सिमर का, लॉक-अप, अनेक रिॲलिटी शोजमधून लोकप्रियता मिळवली आहे
कृष पाठकही विविध मालिकांतून आणि डिजिटल प्रोजेक्ट्समधून ओळख मिळवत आहे