पुढारी वृत्तसेवा
निसर्गाचे वरदान उन्हाळ्याच्या कडाक्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी 'कोकम सरबत' हे सर्वोत्तम पेय मानले जाते.
नैसर्गिक AC: कोकममध्ये शरीरातील उष्णता शोषून घेण्याचे गुणधर्म असतात, म्हणूनच याला शरीराचा 'नॅचरल एअर कंडिशनर' म्हणतात.
पचनासाठी गुणकारी: कोकममधील 'हायड्रॉक्सिसिट्रिक ॲसिड' पचनक्रिया सुधारते आणि गॅस किंवा ॲसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम देते.
हृदयविकारावर नियंत्रण: कोकममध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असल्याने ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करते.
वजन कमी करण्यास मदत: जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर कोकम सरबत शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यासाठी प्रभावी ठरते.
त्वचेसाठी फायदेशीर: कोकममधील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला हायड्रेटेड ठेवतात आणि उन्हामुळे होणारी जळजळ कमी करतात.
रोगप्रतिकारक शक्ती: व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले हे सरबत तुमची इम्युनिटी वाढवते आणि संसर्गापासून संरक्षण करते.
बाजारातील कोल्ड ड्रिंक्सपेक्षा घरगुती कोकम सरबत केव्हाही उत्तम; यात थोडे जिरे आणि काळं मीठ टाकल्यास चव द्विगुणित होते!