Kokum Benefits For Health : चिंचेपेक्षा १० पटीने गुणकारी 'हे' फळ; फायदे वाचून थक्क व्हाल!

पुढारी वृत्तसेवा

चिंचेपेक्षाही आरोग्यदायी असणारे आमसूल (कोकम) आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, याचे अनेक आयुर्वेदिक महत्त्व आहे.

आयुर्वेदाचे जनक महर्षी चरक यांच्या मते, आमसूल हे सामान्य चिंचेपेक्षा शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि आरोग्यवर्धक आहे.

केरळ, कर्नाटक आणि कोकणात आढळणाऱ्या या झाडाच्या फळांना 'रातंबे' म्हणतात, तर याच्या सुकवलेल्या सालीला 'आमसूल' म्हटले जाते.

या फळाचा रस काढून स्वादिष्ट सरबत बनवले जाते, तर काही भागात याची चटपटीत चटणीही आवडीने खाल्ली जाते.

कोकमच्या बीपासून मेणासारखे घट्ट पांढरे तेल निघते, ज्याला 'आमसुलाचे तूप' म्हणतात. हे तेल औषधी आणि पौष्टिक असते.

हिवाळ्यात थंडीमुळे ओठ किंवा पायांना भेगा पडल्यास, कोकम तेल कोमट करून लावल्याने त्वचा लगेच मऊ होते.

रोजच्या जेवणात आमसुलाचा वापर केल्याने अन्न नीट पचते, आतडी कार्यक्षम बनतात आणि पोट साफ राहते.

आमसूल, वेलची आणि साखरेची चटणी करून खाल्ल्याने जुनाट ॲसिडिटी आणि पित्ताचा त्रास मुळापासून दूर होतो.

आमसूल बारीक वाटून, त्यात साखर घालून बनवलेले सरबत प्यायल्याने शरीरातील जळजळ थांबते आणि शांत झोप लागते.

तुमच्या तळपायांची आग होत असेल, तर कोकम तेल गरम करून तळपायांवर चोळा; जळजळ कमी होण्‍यास मदत होते.

येथे क्‍लिक करा.