पुढारी वृत्तसेवा
स्नायू मजबूत करण्याबरोबरच स्मरणशक्ती अफाट करण्यासाठीही व्यायाम ठरतोय फायदेशीर!
नियमित व्यायामामुळे हृदय मजबूत राहते, वजन नियंत्रित होते आणि मधुमेहासारख्या जुनाट आजारांचा धोकाही दूर राहतो.
संशोधनानुसार, जे लोक नियमित व्यायाम करतात, त्यांच्या मेंदूतील 'विचार आणि स्मरणशक्ती' नियंत्रित करणारे भाग इतरांपेक्षा आकाराने मोठे असतात!
सलग ६ महिने ते १ वर्ष मध्यम स्वरूपाचा नियमित व्यायाम केल्यास मेंदूच्या विशिष्ट भागांची कार्यक्षमता आणि आकार वाढतो, असे अभ्यासात समोर आले आहे.
व्यायाम आपली मनस्थिती आणि झोप सुधारून तसेच ताणतणाव आणि चिंता कमी करून अप्रत्यक्षपणे स्मरणशक्ती व विचार करण्याची क्षमता वाढवतो.
संशोधकांच्या मते, 'चालणे' हा मेंदूसाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. तसेच, हृदयाचे ठोके वाढवणारे इतर 'ॲरोबिक' व्यायामही तितकेच फायदेशीर ठरतात.
'जर्नल ऑफ द अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटी'नुसार, चिनी मार्शल आर्ट 'तायची'मुळे एकाग्रता आणि समस्या सोडवण्याची आकलन क्षमता कमालीची सुधारते.
हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या तज्ज्ञांनुसार, दर आठवड्याला किमान १५० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम (उदा. वेगाने चालणे) करण्याचे ध्येय ठेवा.
पहिल्याच दिवशी अतिव्यायाम न करता, रोज काही मिनिटांपासून सुरुवात करा. दर आठवड्याला व्यायामाची वेळ ५ ते १० मिनिटांनी वाढवत जा.
व्यायामाचे मेंदूला फायदे मिळण्यास साधारण ६ महिने लागतात. त्यामुळे संयम ठेवा आणि आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी व्यायामाची सवय कायम ठेवा!