अंजली राऊत
दसरा सणानंतरचा सण :
दसऱ्याच्या सणानंतर चार दिवसांनी, पौर्णिमा रात्रीला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात
शरद पौर्णिमा :
अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे म्हटले जात असून या रात्री लक्ष्मी पृथ्वीवर येत असल्याचे मानले जाते
चंद्रप्रकाशातील सात्विक दूध :
दुधात सुकामेवा सारखी जिन्नस टाकून ते दूध चंद्रप्रकाशात उकळवले जाते, त्यानंतर या सात्विक दूधाचा प्रसाद भाविकांमध्ये वाटला जातो
को-जागरती अर्थात काेण जागे आहे :
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी भक्तांना भेट देते आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण रात्र जागृत राहणाऱ्यांना (को-जागरती) आशीर्वाद देते
धार्मिक कारण :
या दिवशी भाविक दिवसभर उपवास करतात आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच देवी लक्ष्मीचे पूजन करुन अन्नप्राशन करतात, त्यामुळे उपवास करणाऱ्यांनी आधी थंड दूध प्यावे असे शास्त्र सांगते
वैज्ञानिक कारण :
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्याने चंद्राच्या किरणांमध्ये गुणकारी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे चंद्रप्रकाशातील दूध प्यायले जाते.
आयुर्वेदिक कारण :
आयुर्वेदानुसार पावसाळा ऋतूच्या शेवटी 'पित्त', ॲसिडिटी वाढते. त्यामुळे पित्ताला संतुलित करण्यासाठी शरीरासाठी थंड पदार्थांची आवश्यकता असते. थंड दूध आणि तांदळाची खीर हे पित्तासाठी चांगला उपाय मानला जातो.