पुढारी वृत्तसेवा
फार प्राचीन काळापासुन मुंबईतील बेटे उत्तर कोकण म्हणुन ओळखले जायचे. वेगवेगळ्या अशा सात बेटांच्या समुहाने एक बेट निर्माण झालं.
इथले पहिले रहिवीसी हे कोळ जमातीचे होते. डोंगराळ भागात वस्ती करुन राहणारी ही जमात आदिवासी जमात होती.
मुंग या कोळी व्यक्तीने मुंबा देवीचे मंदिर बांधले होते. द्रविड संस्कृतीत पशुपती आणि मातृदेवतांच्या पूजेचा त्यांनी स्वीकार केला.
मुंबादेवी हे मुंबईचे मूळ रुप असावे असा एक तर्क आहे. अ.द. पुसाळकर आणि वि. गो. दिघे या इतिहास संशोधकांने मृण्मयी, मुमई, मुंबई अशी व्युपत्ती दिली आहे. मोमाई देवता एके काळी मुंबईत पुजली जायची, त्यावरुन मुंबई नाव आलं असावं, असेही म्हटलं जातं.
१५३४ मध्ये गुजरातच्या सुलतान ने मुंबई आणि वसई पोर्तुगीजांना दिली. इंग्रजांना सुरत सोबत मुंबईच्या बेटांचीसुध्दा गरज होती म्हणुन इंग्रजांनी १६२९ साली डचांसोबत मुंबई लुटली.
१६६१-६२ मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगीजांची राजकन्या इंन्फंटा कॅथरिन यांच्या विवाहात पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई भेट म्हणुन दिली.
१६७२ साली ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्य ठाणे सुरत वरुन मुंबईला हलवण्यात आले. जेराल्ड आंजियर हा त्याचा मुख्य शिल्पकार होता.
१६८९ मध्ये सिद्दीने शिवडी बेट घेतले आणि इतरत्र प्रचंड नुकसान केले. १६८३ साली कॅप्टन रिचर्ड किगविन याने बंड करुन मुंबई इंग्लंडच्या राजाच्या नावे केली.
१८८८ ला मुंबईचे प्रशासन महानगरपालिकाकडे आले. पुढे १९८५ ला पाच नवीन महानगरपालिका अस्तित्वात आल्या.