Ratan Tata Passed Away | भारताचा 'कोहिनूर' रतन टाटा यांच्याबद्दल जाणून घ्या 'या' ८ गोष्टी

shreya kulkarni

भारताचा 'कोहिनूर' रतन नवल टाटा

रतन नवल टाटा (जन्म: २८ डिसेंबर १९३७, मृत्यू: ९ ऑक्टोबर २०२४) रतन टाटा १९९० ते २०१२ पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष होते.

Ratan Tata Passed Away | File Photo

धर्मादाय ट्रस्टचे प्रमुख

ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ पर्यंत अंतरिम चेअरमन होते. ते त्यांच्या धर्मादाय ट्रस्टचे प्रमुखही होते.

Ratan Tata Passed Away | File Photo

२००० मध्ये 'पद्मभूषण'

२००० मध्ये 'पद्मभूषण' मिळाल्यानंतर, त्यांना २००८ मध्ये 'पद्मविभूषण' या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Ratan Tata Passed Away | File Photo

१९६१ मध्ये टाटामध्ये रुजू

रतन टाटा यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी मिळवली. ते १९६१ मध्ये टाटामध्ये रुजू झाले. त्यांनी टाटा स्टीलच्या दुकानात काम केले.

Ratan Tata Passed Away | File Photo

१९९१ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष

नंतर १९९१मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने बेन्टले, जॅग्वार, लँड रोव्हर आणि कोरस यांचे अधिग्रहण करण्यात आले.

Ratan Tata Passed Away | File Photo

दानशूर व्यक्तिमत्व

ज्यामुळे टाटा समूह मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्रित समूहातून जागतिक व्यवसायात बदलला. रतन टाटा दानशूर म्हणून प्रसिद्ध होते.

Ratan Tata Passed Away | File Photo

६०.६५ टक्के वाटा दानधर्मासाठी

त्यांच्या मिळकतीतील सुमारे ६०.६५ टक्के वाटा दानधर्मासाठी खर्च केला होता. रतन टाटा यांच्या पुढाकारामुळे टाटाने ३० हून अधिक स्टार्ट- अप्समध्ये गुंतवणूक केली आहे.

Ratan Tata Passed Away | File Photo

रतनजी टाटा यांना दत्तक घेतले होते

रतन टाटा नवल टाटा यांचे पुत्र होते. नवल टाटा यांनी टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांना दत्तक घेतले होते.

Ratan Tata Passed Away | File Photo
लाजवाब सौंदर्यांच्या 'समिंद्री'नं पाण्यात लावली आग | Sai Tamhankar instagram
येथे क्लिक करा...