पुढारी वृत्तसेवा
स्वयंपाकघरातील मसाल्यांचा डबा केवळ पदार्थांची चव वाढवत नाही, तर तो आरोग्यासाठी उत्तम औषधी खजिना आहे.
'युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया'च्या संशोधनानुसार, मसाले गंभीर आजारांपासून बचाव करतात.
दालचिनीचे रोजच्या आहारात सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. टाईप-२ मधुमेहाच्या रुग्णांसाठी दालचिनी फायदेशीर मानली जाते.
दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. हे घटक मेंदू आणि यकृताचे आरोग्य जपतात. सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गापासून बचाव करतात.
मिरचीमध्ये असणारे 'कॅप्सॅसिन' (Capsaicin) हे तत्त्व शरीरातील चयापचय क्रिया (Fat Metabolism) जलद करून अतिरिक्त चरबी व कॅलरीज बर्न करण्यास मदत करते.
UCLA च्या अभ्यासानुसार, हळदीतील 'कर्क्युमिन' (Curcumin) हा घटक इतर घटकांसोबत मिळून प्रोस्टेट आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यात मदत करू शकतो.
रोजच्या आहारात हळदीचा वापर केल्यास वयोवृद्धांची स्मरणशक्ती सुधारते, एकाग्रता वाढते आणि मूड चांगला राहण्यास मदत होते, असे अभ्यासात समोर आले आहे.
हळद ही ऑस्टिओआर्थरायटिसमुळे होणारी गुडघेदुखी कमी करते. वाईट (LDL) कोलेस्ट्रॉल घटवून चांगले (HDL) कोलेस्ट्रॉल वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
काळी मिरी, ओवा, आले आणि हळद यांसारख्या मसाल्यांमुळे आतड्यांमध्ये 'गुड बॅक्टेरिया' वाढतात. यामुळे पचनसंस्था मजबूत होऊन संपूर्ण आरोग्य उत्तम राहते.
हळद आणि काळी मिरी एकत्र खाल्ल्यास हळदीचे आरोग्यदायी फायदे कैक पटीने वाढतात. कारण काळी मिरीमुळे शरीराला हळदीतील 'कर्क्युमिन' शोषून घेणे सोपे जाते.