Kitchen Exercises: महिलांसाठी ५ सोपे किचन वर्कआउट्स; वेळ न घालवता ठेवा स्वतःला फिट

Anirudha Sankpal

महिला घरकामात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, पण आरोग्याची, फिटनेसची काळजी घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढून आजारपण टळू शकते.

किचनमध्ये काम करताना महिला हे ५ सोपे व्यायाम सहज करू शकतात

काफ रेजेस

भांडी घासताना पंजांवर वर-खाली झाल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात आणि रक्तभिसरण सुधारते.

स्क्वॅट्स

कपडे किंवा वस्तू उचलताना कंबरेतून वाकण्याऐवजी खाली बसून उठल्याने मांडीचे स्नायू बळकट होतात.

पोटाचे स्नायू

स्वयंपाक किंवा झाडू मारताना १० सेकंद पोट आत ओढून धरल्याने पोश्चर सुधारते आणि कोअर मजबूत होतो.

उभे राहून पाय उचलणे

किचन काउंटरचा आधार घेऊन पाय मागे किंवा बाजूला उचलून हळूहळू खाली घ्या यामुळं शरीराचा समतोल चांगला राहतो.

खांदे व मान स्ट्रेचिंग

काम करताना खांदे गोल फिरवणे, मान झुकवणे आणि कणिक मळून बोटांचा व्यायाम करणे फायदेशीर ठरते.

येथे क्लिक करा