पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री भूमी पेडणेकर कांतारा स्टार ऋषभ शेट्टीच्या ऐतिहासिक चित्रपटात झळकेल
'द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' असे चित्रपटाचे नाव आहे
यात ती कर्नाटकातील महान योद्धा-राणी 'बेलावडी मल्लम्मा' यांची भूमिका साकारेल
बेलावडी मल्लम्मा या कर्नाटकातील बेलावडीतील धाडसी राणी होत्या
मराठा सैन्यासोबत दिलेल्या लढ्यासाठी त्या ओळखल्या जातात
कर्नाटकाच्या इतिहासात त्या शौर्याचे प्रतीक मानल्या जातात
याचे दिग्दर्शन संदीप सिंह यांनी केले आहे
हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील सिनेमागृहात रिलीज होईल
याचे बजेट ५०० कोटीहून अधिक असून दोन भागात बनवले जाणार आहे