Asit Banage
किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब आणि विषारी साप आहे.
मात्र, त्याला केवळ लांबीमुळे किंवा विषाच्या तीव्रतेमुळे ‘किंग’ म्हटले जात नाही, तर त्याच्या शिकारी वृत्तीमुळे त्याला हा किताब मिळाला आहे.
किंग कोब्रा हा इतर सापांना, अगदी विषारी सापांनाही आपले भक्ष्य बनवतो, म्हणूनच त्याला सापांच्या जगाचा राजा मानले जाते.
साधारणपणे 15 ते 18 फूट लांबीचा हा साप जेव्हा फणा काढून उभा राहतो, तेव्हा तो थेट माणसाच्या डोळ्यांच्या पातळीवर येतो.
त्याचे हे रौद्ररूप कोणालाही घाबरवण्यासाठी पुरेसे आहे. किंग कोब्राचा दंश अत्यंत घातक असतो.
याचे विष थेट मज्जासंस्थेवर परिणाम करते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन मृत्यू ओढवू शकतो.
किंग कोब्रा अत्यंत धोकादायक असला, तरी तो सहसा मानवावर विनाकारण हल्ला करत नाही.
तो घनदाट जंगलात राहणे आणि मानवापासून दूर राहणेच पसंत करतो. मात्र, धोका जाणवल्यास तो आक्रमक होऊ शकतो.