पुढारी वृत्तसेवा
समोशाचा खुसखुशीत पोत मिळवण्यासाठी पिठात पुरेसे मोयन (तेल किंवा तूप) घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
समोशाचे पीठ पोळीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट मळावे. खूप मऊ पीठामुळे समोसे खुसखुशीत होत नाहीत.
पीठ मळल्यानंतर ते किमान 20 ते 30 मिनिटे झाकून ठेवा. त्यामुळे समोशाचा बाहेरील थर अधिक चांगला तयार होतो.
गरम सारण भरल्यास समोशाचा आकार बिघडू शकतो आणि तळताना कव्हर फाटण्याची शक्यता वाढते
कडा व्यवस्थित बंद केल्यास तळताना सारण बाहेर येत नाही आणि समोसा सुंदर आकारात राहतो.
समोसे थेट खूप गरम तेलात टाकू नका. कोमट तेलात घालून हळूहळू तळल्यास ते अधिक खुसखुशीत होतात.
समोसे नेहमी कमी ते मध्यम आचेवर तळावेत. यामुळे बाहेरील आवरण कुरकुरीत होते आणि आतपर्यंत समान शिजते.
कढईत खूप समोसे एकत्र टाकल्यास तेलाचे तापमान कमी होते आणि समोसे योग्य प्रकारे तळले जात नाहीत.
समोसे काढल्यानंतर टिश्यू किंवा जाळीवर ठेवल्यास अतिरिक्त तेल निघून जाते आणि कुरकुरीतपणा टिकून राहतो.