पुढारी वृत्तसेवा
अळूची पाने माहीत नाही असा एकही मराठी माणूस सापडणार नाही.
अळूमध्ये प्रोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, सोडियम आणि जीवनसत्त्व 'ए' मुबलक प्रमाणात असते.
अळू रक्तपित्त, जुलाब आणि वायुप्रकोप दूर करण्यासाठी गुणकारी मानले जाते.
अळूच्या कोवळ्या पानांच्या रसात जिऱ्याची पूड मिसळून प्यायल्याने पित्तप्रकोप कमी होतो.
लघवीच्या जळजळीचा त्रास होत असल्यास, अळूच्या पानांचा रस काढून तो सलग तीन दिवस प्यायल्याने आराम मिळतो.
अळू आरोग्यासाठी अग्निदीपक आणि मलावष्टंभक मानला जातो.
बाळंतिणीच्या आहारात अळू समाविष्ट करणे पोषक ठरते.
अळूच्या वड्या करताना त्यात भरपूर तेल आणि गरम मसाला घालावा, ज्यामुळे वायूचा त्रास होत नाही व वड्या सुपाच्य बनतात.
अळूच्या पानांची भाजी वायू व कफकारक असते. वड्या जास्त प्रमाणात खाऊ नयेत आणि कोणत्याही प्रकारचा अळू कधीही कच्चा ठेवू नये!