Secret Behind Kattha|मसाला पानाला लाल रंग देणारा 'कात' नेमका कशापासून बनतो? खास आहे झाडाचे रहस्य

स्वालिया न. शिकलगार

पानगळीचे काटेरी खैर नावाच्या झाडापासून कात बनतो

आयुर्वेदात या झाडाला खदिर (Senegalia catechu), कुष्ठघ्न (त्वचारोग नाशक) म्हणतात

जो मसाला पानात टाकल्यास पानाच रंग लाल होतो

झाडाच्या खोडाचा आतील गाभ्याचे चिप्स करून पाण्यात तासनतास उकळतात

त्याचे घट्ट अर्क केले जाते. ते सुकवून कात बनवतात

उ. प्र., उत्तराखंड, म. प्र., छत्तीसगड, झारखंड, गुजरात, हिमाचल प्रदेशात उत्पादन होते

महाराष्ट्रात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक जंगल परिसरात झाडे आहेत

तोंड येणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात हलणे, घशाची खवखव यावर कात गुणकारी आहे

खैराच्या सालीचा लेप लावल्यास खाज, खरूज, नायटा, जुनाट त्वचारोग बरे होतात

जुलाब, अतिसार लागल्यास अत्यंत अल्प प्रमाणात कात दिल्यास पोटाला आराम मिळतो

खैर काढा रक्त शुद्धीसाठी, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आयुर्वेदात वापरतात

आयुर्वेदिक टूथपेस्ट, दंतमंजन व खोकल्याच्या गोळ्यांमध्ये कात वापरतात

कात बनवताना उरलेल्या उप-उत्पादनाचा (Cutch) वापर चामडे कमावण्यासाठी करतात

मासेमारीची जाळी मजबूत करण्यासाठी, कापडाला नैसर्गिक तपकिरी रंग देण्यासाठी वापर होतो

हे लाकूड अतिशय टणक असल्याने शेतीची अवजारे, घराचे खांब बनवण्यासाठीही वापरतात

Wooden Combs for Healthy Hair | प्लास्टिकचा कंगवा सोडा! 'या' खास लाकडाचा कंगवा वापरताच केसगळती होईल गायब