पुढारी वृत्तसेवा
लोणी एका डब्यात ठेवून त्यात थोडे स्वच्छ पाणी घालावे, जेणेकरून लोणी पूर्णपणे पाण्यात बुडलेले राहील.
लोण्यातील हे पाणी दररोज किंवा दिवसाआड न विसरता बदलावे, यामुळे लोण्याला खवट वास येत नाही.
लोणी साठवताना त्यात थोडे मीठ मिसळून ठेवल्यास ते जास्त काळ टिकण्यास मदत होते.
लोणी नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये (Freezer मध्ये नाही) हवाबंध डब्यात ठेवावे.
लोणी साठवण्यासाठी प्लॅस्टिकऐवजी काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर करणे अधिक चांगले असते.
लोणी काढण्यासाठी नेहमी कोरड्या आणि स्वच्छ चमच्याचाच वापर करावा, जेणेकरून त्याला बुरशी लागणार नाही.
लोणी उघडे ठेवू नका, कारण ते इतर उग्र वासाच्या पदार्थांचा (उदा. कांदा, लसूण) वास लवकर शोषून घेते.
लोणी साठवताना त्यात लिंबाच्या रसाचे दोन-तीन थेंब टाकल्यास त्याचा ताजेपणा टिकून राहतो.