Katas Raj Shiva Temple: पाकीस्तानातील अद्भुत शिवमंदिर, जिथे पडले होते महादेवांचे अश्रू...जाणून घ्या त्यामागचे रहस्य

अंजली राऊत

कटासराज मंदिर पाकिस्तानच्या चकवाल गावापासून 40 कि.मी. अंतरावर कटास मधल्या एका पर्वतावर आहे

Picasa

पाकिस्तानातील महादेवाच्या मंदिराबद्दल जाणून घेऊया... जिथे पडले होते महादेवाचे अश्रू...

Picasa

पाकिस्तानमध्ये कटासराज नावाचे हे शिव मंदिर असून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यामध्ये आहे.

Picasa

पौराणिक मान्यता : कटासराज मंदिरच कटाक्ष कुंड भगवान शिवांच्या अश्रुनी बनलं आहे अशी मान्यता आहे.

Picasa

कुंडाची कथा : असं म्हटल जात की, सतीने स्वतःला अग्निच्या हवाली केले होते तेव्हा सतीच्या वियोगात महादेव भगवान शिव त्यांच्या दुखा:त इतके रडले की त्यांच्या अश्रुंनी दोन कुंड तयार झाले. त्यातील एक कुंड राजस्थान मधील पुष्कर नावाच तीर्थ आहे आणि दुसर कटासराज मंदिरात आहे.

Picasa

महादेवांच्या अश्रूंपासून तलाव तयार झाला, ज्याला कटक्ष कुंड म्हटले जाऊ लागले, त्यानंतर कटक्ष कुंडावरून मंदिराचे 'कटासराज' नाव पडले.

Picasa

कटासराज हे मंदिर महाभारत काळात बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. पांडवांनी त्यांच्या वनवासाचा काही काळ या मंदिरात घालवला होता असेही म्हटले जाते

Picasa

कटासराज मंदिराच्या आजूबाजूला इतर अनेक लहान लहान मंदिरे असून ती दहाव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.

Picasa

कटासराज मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असून पाकिस्तानमधील सर्वात प्राचीन असे हिंदू तीर्थस्थळांपैकी एक पवित्र स्थळ आहे.

Picasa

पाकिस्तानातील कटासराज मंदिराचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Picasa

असे म्हटले जाते की कटासराज मंदिराच्या ठिकाणी सुरुवातीला सात मंदिरांचा समूह होता. देशभरातून शिवभक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात

Picasa
रामायण काळातील 'नाशिक' : प्रभू श्रीराम कोठे थांबले होते?