माणसाच्या आडवी मांजर गेली की, अशुभ मानले जाते..मात्र, एक असं गाव आहे जिथे माजंरीला देव म्हणून तिची पूजा केली जाते..कर्नाटकात हे गाव असून गावात १००० वर्षांपासून मांजरीची पूजा करण्याची प्रथा आहे..कर्नाटकातील 'बेक्कालेले' असं या गावाचं नाव.गावाचे नाव कन्नड भाषेतील ‘बेक्कू’ (मांजर) या शब्दावरून पडले..या गावात मांजरीचं प्राचीन मंदिर असून तिची विधीवत पूजा केली जाते..स्थानिक लोक मांजरीला 'मनगम्मा' देवीचा अवतार मानतात..देवीने मांजरीचे रूप धारण करून गावकऱ्यांचे रक्षण केले, अशी यामागील आख्यायिका आहे..गावात जर कोणी मांजरीला नुकसान पोहोचवले, तर त्याला गावातून बाहेर काढले जाते..एखादी मांजर मेल्यास, तिला विधी-विधानासह दफन केले जाते..गावात मांजरीच्या रुपातील 'मनगम्मा देवी'ची दरवर्षी यात्रा भरते. .येथे क्लिक करा