Anirudha Sankpal
कंगना रनौत यांचा दावा
जास्त प्रमाणात प्रोटीन खाल्ल्याने माणूस सुस्त किंवा कमी समजदार (डम्ब) होतो, असा दावा कंगना रनौत यांनी केला.
पारंपरिक आहाराचे समर्थन
त्यांनी भारतीय पारंपरिक खानपान सर्वोत्तम असल्याचे सांगत जंक फूड आणि प्रोटीन शेक टाळण्याचा सल्ला दिला.
वैज्ञानिक पुराव्याचा अभाव
न्यूट्रीशनिस्ट रिया ओसवाल यांच्या मते, प्रोटीनचा मेंदूच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.
अमीनो ॲसिडचे महत्त्व
प्रोटीनपासून मिळणारे 'अमीनो ॲसिड' न्यूरोट्रांसमीटर तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.
डाइटचा समतोल बिघडणे
डॉ. असमा पठान यांच्या मते, कोणत्याही एका घटकाचे अतिसेवन करून फळे व भाज्या टाळल्यास आहाराचा समतोल बिघडू शकतो.
अतिसेवन अयोग्य
गरजेपेक्षा जास्त प्रमाणात कोणताही पोषक घटक घेणे आरोग्यासाठी योग्य नाही.
संतुलित आहार महत्त्वाचा
निरोगी राहण्यासाठी आहारा मध्ये सर्व पोषक तत्त्वांचा समावेश असणारा 'बॅलन्स डाइट' अत्यंत आवश्यक आहे.
तज्ज्ञांचा निष्कर्ष
जास्त प्रोटीनमुळे मेंदू कमकुवत होतो हा दावा चुकीचा असून, संतुलित आहार आणि व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.