पुढारी वृत्तसेवा
अपघाताच्या अफवा पसरल्याने अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
काजल अग्रवालने सोशल मीडियावर पोस्ट करून "माझ्या अपघाताच्या बातम्या खोट्या आहेत" असे सांगितलं आहे.
या घटनेनंतर, काजल अग्रवालच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स आणि आगामी चित्रपटांबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
काजल अग्रवालने नुकतेच मीडियावर मालदीवमधील फोटो शेअर केले आहेत.
तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'The Maldives: my recurring love affair'
तिच्या फोटोमध्ये नैसर्गिक सौंदर्य आणि ग्लॅमरस अंदाज दोन्ही दिसतो.
काजलचा प्रवास फक्त विश्रांतीसाठी नाही तर सौंदर्य अनुभवण्यासाठीही आहे.
चाहत्यांनी फोटोंना अनेक कमेंट केल्या आहेत.
रामायण, द इंडिया स्टोरी, गरूड या आगामी चित्रपटांमध्ये ती दिसणार आहे.