Jyesthamadh benefits: पावसाळ्यात आजार टाळण्यासाठी घरात 'ज्येष्ठमध' हवाच; जाणून घ्या फायदे!

पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठमध आयुर्वेदातील गुणकारी औषध आहे. जाणून घेवूया याचे आश्चर्यकारक फायदे.

पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्यावर ज्येष्ठमध पूर्वीपासूनच प्रभावी उपाय आहे.

ज्येष्ठमधातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

पावसाळ्यात अपचनाचा त्रास होतो. ज्येष्ठमधाचे सेवन पचनक्रिया सुधारण्‍यास मदत होते.

ज्येष्ठमधाच्या वापरामुळे पावसाळ्यातील त्वचेचे इन्फेक्शन आणि डाग दूर होतात.

ज्येष्ठमध फुफ्फुसांचे आरोग्य उत्तम ठेवून श्वास घेण्यास होणारा त्रास कमी करतो.

पावसाळ्यात तळलेले किंवा मसालेदार पदार्थामुळे ॲसिडिटी होते. ज्येष्ठमध चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोटातील आम्लाचे प्रमाण संतुलित राहते.

ज्येष्ठमधाचा लहान तुकडा चघळा किंवा त्याचा चहा/काढा बनवून प्या.

ज्येष्ठमध गुणकारी असला तरी हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.

येथे क्‍लिक करा.