Healthy Wafers Recipe : वेफर्स बनवा चटपटीत-हेल्दी; ट्राय करा ५ सोप्या टिप्स

पुढारी वृत्तसेवा

नेहमीचे बटाटा वेफर्स चवदार असतात, पण त्यात भरपूर प्रमाणात तेल, मीठ आणि रिफाइंड कार्ब्स असतात.

जाणून घेऊया अशा टिप्स वेफर्सचा कुरकुरीतपणा कायम ठेवून तुम्‍ही त्‍यातील अनहेल्दी घटक कमी करू शकता.

वेफर्स डीप-फाय (तळण्या) ऐवजी बेक करा, एअर-फ्राय करा. यामुळे तेलाचा वापर ७० ते ८० टक्क्यांनी कमी होईल वेफर्स देखील कुरकुरीत होतील.

फक्त बटाट्याचे वेफर्स बनवण्याऐवजी फायबर आणि व्हिटॅमिन्सने भरपूर असलेल्या भाज्या वापरा. बीट, दुधी भोपळा.

भाज्यांच्या कापंवर बेसन, मूग डाळ पेस्ट किंवा ओट्सची पावडर लावा, किंवा बेक करण्यापूर्वी हलका कोट करा.

अशा वेर्फसमुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही आणि पोटही जास्त वेळ भरलेले राहते.

वेर्फसवर वरुन जास्त मीठाऐवजी चाट मसाला, भाजलेले जिरे, मिरी पावडर, लसूण पावडर,किंवा लिंबाचा रस वापरून वेफर्स चवदार बनवा.

भाज्यांचे पातळ काप ऑलिव्ह ऑइल-मसाल्यात मिक्स करून १६०°C वर २०-२५ मि. बेक करा; वेफर्स पूर्णपणे थंड झाल्यावर अधिक कुरकुरीत होतील!

हेल्दी वेफर्सही प्रमाणातच खा; थेट पाकिटातून खाण्याऐवजी वाटीत काढून घेतल्यास प्रमाणाचा अंदाज राहतो.

येथे क्‍लिक करा.