पुढारी वृत्तसेवा
चालताना किंवा उठताना सांध्यातून कट-कट आवाज येतो का?
हा आवाज शरीरातील वातदोष वाढल्याचे लक्षण असू शकते.
सांध्यांना तीळाचे किंवा एरंडेल तेलाने हलका मसाज केल्यास आराम मिळू शकतो.
सकाळी 1 चमचा तीळ चावून खाल्ल्याने हाडांना पोषण मिळते.
आहारात एरंडेल तेलाचा मर्यादित वापर केल्याने सांध्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
कोरडे आणि अतितिखट पदार्थ वात वाढवू शकतात, त्यामुळे त्यांचे सेवन कमी करा.
पुरेसे पाणी पिणे आणि नियमित व्यायाम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
सांध्यांसोबत वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये अडचण असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
योग्य आहार, तेलमालिश आणि दिनचर्या यामुळे सांधे निरोगी ठेवणे शक्य आहे.