पावसाळा सुरू झाला की अनेकदा घरातील मीठ आणि साखरेला पाणी सुटते.अशावेळी त्याचा वापर कठीण होऊन बसतो. अशावेळी त्याचा वापर कठीण होऊन बसतो हे टाळण्यासाठी पुढील टिप्स वापरा.सर्वप्रथम मीठ आणि साखर प्लास्टीक किंवा स्टीलच्या डब्यात न ठेवता काचेच्या डब्यात ठेवा.साखरेत आणि मिठात टुथपीक ठेवल्याने त्यातील ओलावा कमी होण्यास मदत होते.साखरेच्या आणि मिठाच्या तळाशी ब्लोटींग पेपर ठेवा त्यामुळे ते ओलसर होण्याचे प्रमाण कमी होईल.साखर आणि मिठाच्या बरणीमध्ये लवंग ठेवल्यानेदेखील ते ओलसर होण्याची शक्यता कमी होते. याशिवाय साखरेला सुगंधही चांगला येतो.विशेष म्हणजे साखर किंवा मिठामध्ये कधीही ओला चमचा घालू नये. यामुळे देखील ते ओलसर होण्याची शक्यता असते.जेव्हा बरणीच्या झाकणाला टिशू पेपर लावल तेव्हा दुसऱ्या दिवशी तो बदला.