Anirudha Sankpal
जया किशोरी म्हणतात की, कोणताही संबंध या तीन गोष्टींवरच टिकतो. केवळ प्रेम पुरेसे नाही, तर जोडीदाराच्या भावना समजून घेणे आणि त्यांचा मनापासून सन्मान करणे आवश्यक आहे.
नात्यात येण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी घाई करू नका. एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या. समोरच्या व्यक्तीचे विचार, जबाबदारीची जाणीव आणि मनोवृत्ती जाणून घेणे आवश्यक आहे.
'लव्ह इज ब्लाइंड' ही कल्पना चुकीची आहे. आकर्षण अंधळे असू शकते, पण प्रेम नेहमी डोळे उघडून केले जाते. आपल्या जोडीदाराला वास्तववादी दृष्टिकोनातून पाहा.
वैवाहिक जीवनात पती-पत्नीने एका टीमप्रमाणे काम केले पाहिजे. घरगुती कामे, जबाबदाऱ्या किंवा मोठे निर्णय घेणे, प्रत्येक गोष्टीत एकमेकांना सहकार्य आणि सहमती आवश्यक आहे.
नात्यात मोकळा आणि नियमित संवाद असणे खूप महत्त्वाचे आहे. मनात शंका असेल तर थेट बोला. शंका घेण्याऐवजी संवाद साधल्यास समस्या लगेच सुटते.
एकमेकांमध्ये सतत खाम्या किंवा चुका काढल्याने नातं अधिक बिघडतं. आपले जीवन सुधारण्यासाठी कोणी कोणाला सुधारणार नाही. एकमेकांवर गोष्टी लादण्याऐवजी आपल्या समस्या स्वतः सोडवा.
आपल्या खासगी वैवाहिक आयुष्याबद्दल कुणाकडूनही सल्ला घेऊ नका. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून आपल्या जोडीदाराशी भांडण करू नका.
कोणतीही व्यक्ती पूर्णपणे 'परफेक्ट' नसते. नातं टिकवून ठेवण्यासाठी जोडीदार परफेक्ट असण्यापेक्षा तुमचे प्रयत्न परफेक्ट असणे महत्त्वाचे आहे. प्रयत्न कमी झाले की नातं तुटतं.
प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते. नात्यात येणाऱ्या छोट्या-मोठ्या समस्यांमध्ये शांत राहून एकमेकांना स्वीकारण्याची आणि समजून घेण्याची भावना ठेवा.