'या' देशाने विकसित केले 'सूपरफास्ट' इंटरनेट, एका सेकंदात होणार संपूर्ण नेटफ्लिक्स डाउनलोड!
पुढारी वृत्तसेवा
जगातील सर्वात वेगवान इंटरनेट स्पीड विकसित केल्याचा दावा जपानने केला आहे.
जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजीने प्रति सेकंद १.०२ पेटाबिट्स (Pbps) इतका इंटरनेट वेग साध्य केल्याची घोषणा केली आहे. 1पेटाबिट्स =1,000 पेटाबिट्स
इंटरनेटच्या या वेगामुळे माहितीचे हस्तांतरण इतके जलद होऊ शकते की, संपूर्ण नेटफ्लिक्स लायब्ररी केवळ एक सेकंद लागेल.
रिपाेर्टनुसार , सध्या नेटफ्लिक्सच्या संपूर्ण लायब्ररीचा आकार ४५,००० GB इतका आहे.
जपानमधील इंटरनेटचे स्पीड हे भारतातील सरासरी इंटरनेट वेगापेक्षा १.६ कोटी पटीने अधिक आहे.
सुपरफास्ट इंटरनेट प्राेजेक्टसाठी NICT ने सुमितोमो इलेक्ट्रिक आणि युरोपीय संशोधकांसोबत काम केले.
हा अतिवेगवान इंटरनेट वेग साध्य करण्यासाठी NICT ने विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या ऑप्टिकल फायबर केबलचा वापर केला आहे.
यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या मोठ्या प्रमाणावर डेटा वापरणाऱ्या ॲप्लिकेशन्समुळे निर्माण झालेली हाय-स्पीड इंटरनेटची वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यास मदत हाेणार आहे.
सार्वजनिक वापरासाठी ही सुविधा केव्हा उपलब्ध होईल, याबाबत NICT ने कोणतीही निश्चित वेळमर्यादा दिलेली नाही.
येथे क्लिक करा.