कॉफीमध्ये 'ही' एक गोष्ट मिसळा, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
पुढारी वृत्तसेवा
मागील काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर तूप-कॉफी (Ghee coffee) ट्रेंड होत आहे. काॅफीत तूप मिसळल्याने काही जण तिला बुलेटप्रूफ कॉफी म्हणूनही ओळखतात.
तुपामध्ये चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे असते, जे वजन कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि शरीरात ऊर्जा राखण्यास मदत करते.
चला तरजाणून घेऊया तूप-कॉफी पिण्याचे फायदे.
तूप कॉफी वजन कमी करण्यास मदत करू शकते. कारण ती चयापचय गतिमान करते आणि भूकेची तीव्रता कमी हाेण्यास मदत करते.
तुपामध्ये असणारे ब्युटीरिक ॲसिड आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. यामुळे पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
कॅफिन आणि तूप एकत्र मिसळल्यास शरीरात दीर्घकाळ ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात.
सुरुवातीला कॉफीमध्ये कमी प्रमाणात तूप घाला आणि नंतर हळूहळू तुमच्या आवडीनुसार प्रमाण वाढवा.
तूपामध्ये चरबी आणि कॅलरीज खूप जास्त असतात. तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर कॉफीमध्ये तूपाचे प्रमाण मर्यादित करा.
तुम्हाला दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असेल तर तूप कॉफीमुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
येथे क्लिक करा.