Anirudha Sankpal
गेल्या काही वर्षांत जपानमध्ये अस्वल आणि मानवामधील संघर्ष कमालीचा वाढला असून, अस्वलाच्या हल्ल्यात १३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
जापानमध्ये जंगलात अन्नाची कमतरता निर्माण झाल्यामुळे भूकेले अस्वल अन्न शोधत गावे आणि नागरी भागांमध्ये शिरत आहेत.
या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी जापान सरकारने शिकार करण्याचे नियम शिथिल केले असून मोठ्या प्रमाणावर अस्वलांना मारले जात आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात जपानमध्ये १४ हजारपेक्षा जास्त अस्वलांना मारण्यात आले आहे.
हजारो अस्वलांना मारूनही मानवावर होणारे हल्ले पूर्णपणे थांबलेले नाहीत, ज्यामुळे वन्यजीव तज्ज्ञांनी सरकारच्या या धोरणावर चिंता व्यक्त केली आहे.
आययुसीएन (IUCN) नुसार संकटग्रस्त श्रेणीत येणाऱ्या आशियायी काळ्या अस्वलांच्या अस्तित्वावर या मोठ्या प्रमाणातील शिकारीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
करुइजावा सारख्या काही भागांत बियर डॉग्सचा वापर करून आणि अस्वलांना जंगलात परत पाठवून यशस्वीरीत्या मानवी संघर्ष टाळला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, केवळ अस्वलांना मारण्याऐवजी जंगलात नैसर्गिक अन्न वाढवणे आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हाच यावरील खरा उपाय आहे.