पुढारी वृत्तसेवा
जाह्नवी कपूरने आगामी 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लाल रंगातील जबरदस्त लूक शेअर केला आहे.
मागील काही चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटावर खिळल्या आहेत.
हा नवा बोल्ड लूक चित्रपट चर्चेत आणण्यासाठी पुरेसा आहे.
लाल रंगाचा लेहेंगा खास डिझाईन केलेला आहे.
लेहेंग्याच्या प्रत्येक चुणीमध्ये (fold) एक खास 'मूव्हमेंट' जाणवते, ज्यामुळे तिचा हा लूक अधिक आकर्षक झाला आहे.
मॅचिंग रंगाच्या ब्लाऊजने या लूकचा आकार तीक्ष्ण (sharp) ठेवला आहे. त्यामुळे पारंपरिक असूनही या पेहरावाला एक मॉडर्न आणि स्टायलिश टच मिळाला आहे.
लक्ष वेधून घेण्यासाठी तिला heavy दागिन्यांची गरज भासली नाही. फक्त हलकेसे कानातले चमकत आहेत.
साध्या मेक-अपने तिचा नैसर्गिक तेज (glow) तसाच ठेवला आहे. मोकळे केस तिच्या 'फायर' लूकला अधिक सुंदर दिसतात.
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.