मोहन कारंडे
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा परदेशी सध्या तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे.
दिशाने नुकतेच तिचे स्विमिंग पूलमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.
दिशाला झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून प्रसिद्धी मिळली.
तिने या मालिकेत तुळजा हे पात्र साकारलं होतं. पण, फेब्रुवारी 2025 मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव ही मालिका सोडली.
गेल्या महिन्यात तिने स्वत:ची प्रोडक्शन कंपनी सुरू करत असल्याचेही जाहीर केले होते.
दिशाचा जन्म मुंबईत झाला आहे. तिने रुईया कॉलेजमधून शिक्षण घेतले.
२०२४ मध्ये तिने 'मुसाफिरा' या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.