'परम सुंदरी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी कपूरने या लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले . जान्हवी सिद्धार्थ मल्होत्रासोबत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट २९ ऑगस्टरोजी रिलीज होणार आहे .तिने खांद्यावर बारीक पट्ट्या असलेला, हवेशीर असा स्ट्रॅपी फ्लोई मिडी ड्रेस परिधान केला आहे.या ड्रेसमध्ये कॉर्सेट-इन्स्पायर्ड बॉडिस, बारीक पट्ट्या आणि समोर लेस-अप डिटेलिंग आहे .ड्रेसवरील गडद केशरी रंगातील फुले, गुलाबी शिंपडलेले डिझाईन, हिरव्या छटा आणि सौम्य पेस्टल टचेस उठून दिसत आहे.जान्हवीने अॅक्सेसरीज अगदी साध्या ठेवल्या आहेत, ज्यामुळे ड्रेसचे सौंदर्य अधिक उठून दिसत आहे .पांढऱ्या रंगाचे हिल्स घातल्याने उंची उठून दिसून लूकला मिनिमलिस्ट टच मिळाला.तिचा मेकअपही अगदी नैसर्गिक आणि लेस-इज-मोअर असा आहे.जान्हवी आणि सिद्धार्थ दोघेही त्यांच्या प्रमोशनल अपिअरन्स आणि ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे चर्चेत आहेत .येथे क्लिक करा