जगन्नाथ रथयात्रा : आस्थेचा महाउत्सव!
पुढारी वृत्तसेवा
उड़ीसा राज्यातील पुरी येथे यंदा भगवान श्रीजगन्नाथाची वार्षिक रथयात्रा शुक्रवार, २७ जून २०२५ पासून सुरू होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला ही भव्य यात्रा अपूर्व उत्साहात साजरी केली जाते.
भगवान श्रीजगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र (बलराम) आणि भगिनी सुभद्रा यांच्यासह रथावर आरूढ होतात.
रथयात्रेच्या पहिल्या दिवशी ‘छेरा पंहरा’ हा वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक विधी पार पाडला जातो. पुरीचे गजपति महाराज (उड़ीशाचे पारंपरिक शासक) स्वतः सोनेरी झाडूने रथाच्या मार्गाची सफाई करतात.
दरवर्षी भगवान जगन्नाथ , बलभद्र आणि सुभद्रा यांच्या भव्य रथ संपूर्णपणे नव्याने निर्माण केले जातात.
फासी आणि धौरा या विशिष्ट झाडांच्या पवित्र लाकडाचा वापर करून रथ तयार केले जातात.
रथ सुमारे ४० ते ४५ फूट उंच असतात. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या कोणत्याही भागाचा पुनर्वापर केला जात नाही.
यात्रेत सहभागी रथ ओढणार्या भाविकांना आध्यात्मिक पुण्यासह आशीर्वाद मिळतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
देवतांची रथांवर प्रतिष्ठापना झाल्यानंतर यात्रा सुरू होते. त्या क्षणापासून मंदिराचे पुजारीही रथावर प्रवेश करू शकत नाहीत. ही परंपरा काटेकोरपणे पाळली जाते.
येथे क्लिक करा