Jacob Sheep : जगातील एकमेव चार शिंगे असलेली मेंढी

Namdev Gharal

जगात सवत्र ज्या बकऱ्या, मेंढ्या आढळतात त्‍यांना सर्वसाधारण दोन शिंगे असतात, प्रत्‍येक प्रजातीप्रमाणे ही लहान - मोठी असतात

पण पूर्ण बकऱ्यांच्या प्रजातीमध्ये एकमेव दुर्मिळ अशी एक बकरी आहे जिला चार शिंगे असतात

ही खूपच प्राचिन जवळपास 3000 वर्षापूर्वीची प्रजाती आहे. पांढऱ्या कातडीवर काळे डाग याचे रूप खुलवतात

या मेंढीचा धार्मिक ग्रंथांमध्येही उल्लेख असल्याने ती “Biblical Sheep” म्हणूनसुद्धा ओळखली जाते.

Jacob Sheep ची उत्पत्ती मध्य पूर्वेत हजारो वर्षांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. बायबलमध्ये वर्णन केलेल्या “Jacob’s flock” वरून या मेंढीचे नाव पडले

अनोखी शिंगे - ही सर्वात प्रसिद्ध आहे शिंगामुळे हिला सर्वसाधारण 4 शिंगे असतात काहीवेळा 6 सुद्धा असतात

आकाराने मध्यम आणि शरीर मजबूत.स्वभावाने शांत, बुद्धिमान आणि माणसांशी लवकर जुळवून घेणारी ही जात आहे

या मेंढीची लोकर खूप मऊ, उबदार असल्यामुळे यापासून अनेक प्रीमियम सूत बनवले जाते.

रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्‍यामुळे खूप कमी निगा राखावी लागते तसेच कठीण हवामानातही टिकून राहते.

दुर्मिळ असल्याने मेंढीपालक, फार्मर्स आणि ब्रीडर्समध्ये खूप लोकप्रिय जात आहे.

Ambergris| अंबरग्रीस किंवा व्हेल माशाची उलटी