Home Gardening Tips : मिनी गार्डनमध्ये लावा 'या' ५ भाज्या; घरातच मिळेल ताज्या भाज्यांचा बंपर साठा!

पुढारी वृत्तसेवा

घरातच पिकवा सेंद्रिय भाज्या

कुंड्यातील सुकलेली रोपे काढून टाका. सप्टेंबरमध्ये मिनी गार्डनमध्ये पेरणी करून मिळवा ताज्या, सेंद्रिय भाज्या!

पालक भाजीची करा पेरणी

रुंद कुंडी किंवा टबमध्ये माती आणि शेणखताच्या मिश्रणात पालकाची पेरणी करा.भाज्या मिळण्याचा कालावधी: २५ ते ३० दिवस

ताज्या पालकाची कापणी एकदा कापणी केल्यानंतर पालकाला पुन्हा नवी पाने फुटतात. भाज्या मिळण्याचा कालावधी: २५ ते ३० दिवस

घरातच पिकवा फ्लॉवर

चांगला निचरा होणाऱ्या मातीत फ्लॉवरची रोपे लावून ५-६ तास सूर्यप्रकाशात ठेवा.भाज्या मिळण्याचा कालावधी: नोव्हेंबरपर्यंत (सुमारे ६० दिवस)

झणझणीत हिरवी मिरची

मिरचीचे रोप एकदा व्यवस्थित वाढले की दीर्घकाळ ताज्या मिरच्या मिळत राहतात. भाज्या मिळण्याचा कालावधी: १ ते २ महिने.

घरगुती मिरचीचे रोप

बी पेरून रोपे थोडी मोठी झाल्यावर दुसऱ्या कुंडीत योग्य अंतरावर लावा.भाज्या मिळण्याचा कालावधी: नियमितपणे दीर्घकाळ

गुणकारी आणि ताजा मुळा

आरोग्यासाठी फायदेशीर असलेला मुळा कुंडीत किंवा वाफ्यांमध्ये सहज घेता येतो.भाज्या मिळण्याचा कालावधी: ३५ ते ४० दिवस

वांग्याची सोपी लागवड

सप्टेंबर महिना योग्य आकाराच्या कुंडीत वांग्याची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम आहे.भाज्या मिळण्याचा कालावधी: १ ते २ महिने

दीर्घकाळ मिळतील वांगी

थोड्या काळजी आणि निगराणीमुळे वांग्याचे झाड उत्तम बहरते.भाज्या मिळण्याचा कालावधी: दीर्घकाळ.

येथे क्‍लिक करा.