Namdev Gharal
ईसबगोल Psyllium husk नावाचा एक तंतुमय पदार्थ शरिरासाठी खपू उपयुक्त असतो, ज्यावेळी पोटात काही गडबड होते त्यावेळी डॉक्टर तो आपल्याला सुचवतात
ईसबगोल याचे पिक असते याला प्लँटॅगो ओव्हाटा (Plantago ovata) असे नाव आहे. याच्या बियांवर जो पांढरे कवच असते तेच इसबगोल असते. गुजरातमध्ये प्रामुख्याने हे पीक घेतले जाते
ईसबगोल हे नॅचरल फायबर आहे. त्यावेळी कॉन्स्टीपेशन होते त्यावेळी हे खाल्ले की आपले पोट साफ होण्यास मदत होते, याचबरोबर इतर अनेक फायदे इसबगोलचे असतात
पण त्याचा दुसराही उपयोग म्हणजे हेच इसबगोल आपले लूज मोशन सुद्धा ठिक करु शकते
जर तुम्ही ईसबगोल दह्या बरोबर घेतलेत की दह्यातील गुड बॅक्टेरिया व इसबगोल मिळून तुमच्या आतड्यातील इन्फेक्शन, सूज कमी करते त्यामुळे तूमचा लूज मोशनचा त्रास कमी होतो
दुसरे म्हणजे ईसबगोल तुम्ही दुधाबरोबर घेतले की. यातील फायबरमुळे तुम्हाला कॉन्स्टीपेशन किंवा IBS चा त्रास कमी होतो
जेवणाआधी तुम्ही पाण्यात मिसळले तर ते जेलीसारखे फुगते जे पोटात गेल्यानंतर भूक कमी होते परिणामी वजन कमी होण्यासाठी सुद्धा ईसबगोल फायदेशीर ठरते
रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो, जो हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला आहे.