अविनाश सुतार
टॅटू काढताना सुईंच्या मदतीने त्वचेवर छिद्र पाडून शाई ‘डर्मिस’ नावाच्या त्वचेच्या दुसऱ्या थरात टाकली जाते. या प्रक्रियेमुळे समस्या उद्भवू शकतात
शाईचा संसर्ग होऊन ‘ग्रॅन्युलोमा’ नावाची गाठ उठते, किंवा त्वचेचे क्षयरोग आणि बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतात
काही लोकांमध्ये टॅटूनंतर जाड, उंच उठाव असलेले डाग तयार होतात, जे सहज जात नाहीत
निकृष्ट दर्जाच्या शाईत पारा (mercury) किंवा डायक्रोमेट सारखे घातक पदार्थ असू शकतात, जे त्वचेला हानी पोहोचवू शकतात किंवा ऍलर्जी निर्माण करू शकतात
सुई किंवा शाई निर्जंतुक नसेल, तर हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी, एचआयव्ही किंवा एमआरएसए सारखे जीवघेणे संसर्ग होऊ शकतात
ज्यांची त्वचा संवेदनशील आहे किंवा ज्यांना ऍलर्जीचा इतिहास आहे, त्यांनी टॅटू काढ ण्यापूर्वी ‘पॅच टेस्ट’ करून घ्यावी
सोरायसिस, एक्झिमा, व्हिटिलिगो (पांढरे डाग) किंवा लायकेन प्लॅनस असे आजार असतील, तर टॅटू करून घेणे धोकादायक ठरू शकते
सोरायसिस किंवा व्हिटिलिगो असलेल्या रुग्णांमध्ये टॅटू घेतल्याने आजार वाढू शकतो, काही दुर्मीळ आजारांसारखे पायोडर्मा गँग्रेनोसम किंवा मॉर्फिया देखील टॅटूमुळे उद्भवू शकतात
टॅटू लेझर उपचाराने काढता येतात, लेझर शाईचे कण अतिसूक्ष्म तुकड्यांमध्ये विभाजित करते आणि शरीर त्यांना हळूहळू बाहेर टाकते