Titwi bird | टिटवीचे ओरडणे अशुभ का मानले जाते? काय आहे सत्‍य!

Namdev Gharal

आपल्याकडे टिटवी Red-wattled Lapwing या पक्ष्याबद्दल समाजात अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. टिटवीचे ओरडणे अशूभ मानले जाते

पण सत्‍य काय हे जाणून घेऊ, रात्रीच्या शांततेत टिटवीचा 'टिट-टिट-टिटवी' असा कर्कश आवाज अनेकांना भीतीदायक वाटतो. यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत.

महाभारतकाळीन कथे नुसार युद्ध झाले त्‍या मैदानावर टिटवीची अंडी होती. तिच्या रक्षणासाठी ती जोरजोरात ओरडू लागली पण अर्जूनाच्या हत्तीची घंटा त्‍यां अंड्यावर अलगद पडली व ती सुरक्षित राहिलीत

या रणांगणवर प्रचंड संहार झाला त्‍यावेळी एकट्या टीटवीचाच आवाज त्‍याठिकाणी घुमत होता. तेव्हा पासून तिचे ओरडणे अशूभ मानले जाऊ लागले.

रंणांगनावर जिथे मृत्यू आणि विनाश असतो तिथे टीटवी ओरडली, यामुळे जुन्या काळात मानले जायचे की, टिटवी घरावरून ओरडत गेली की काहीतरी अघटीत घडणार आहे

पण यामागे वैज्ञानिक कारणे आहेत, टिटवी हा पक्षी अत्यंत सतर्क असतो. तो जमिनीवर आपले घरटे बांधतो

रात्रीच्या वेळी जर कोणी त्याच्या जमीनीवर असलेल्या घरट्याजवळ आले किंवा काही हालचाल जाणवली, तर तो मोठ्याने 'टिट-टिट-टिटवी' असा ओरडून धोक्याची सूचना देतो.

पण आपल्या मनावर पौराणिक कथांमुळे एक पगडा आहे त्‍यामुळे टीटवीचे ओरडणे अशूभ मानतो पण या पाठिमागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही, निवळ्ळ अंधविश्वास आहे.

टिटवीने अंडी कोठे घातली आहेत, यावरून पावसाचा अंदाज वर्तवला जातो. जर तिने उंचावर अंडी घातली, तर मोठा पाऊस येईल असे मानले जाते.

टिटवीचा आवाज हे केवळ तिच्या स्वसंरक्षणाचे साधन आहे. विज्ञानाच्या दृष्टीने यात कोणतेही शुभ-अशुभ संकेत नसून, तो केवळ एक निसर्गदत्त स्वभाव आहे.

टिटवी झाडावर बसत नसल्यामुळे उत्क्रांतीच्या ओघात तिच्या पायाचा मागचा अंगठा नाहीसा झाला आहे. त्‍यामुळे तिचे आयुष्यवर जमिनीवरच असते

Quokka | हा आहे जगातील सर्वात आनंदी प्राणी!