पुढारी वृत्तसेवा
जेवणानंतर गोड म्हणून आईस्क्रीम खाणे अनेकांना आवडते; पण आयुर्वेदानुसार हे कितपत योग्य आहे?
आयुर्वेद नेहमी ऋतू, वेळ आणि शरीराच्या प्रकृतीनुसार (वात-पित्त-कफ) अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला देतो.
आयुर्वेदानुसार आईस्क्रीम हे गुणधर्माने अतिशय थंड (शीत), पचायला जड आणि कफ वाढवणारे मानले जाते.
थंड आईस्क्रीम खाल्ल्याने अन्नाचे पचन करणारा शरीरातील 'जठराग्नी' मंदावतो. यामुळेपचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
रात्री शरीरात नैसर्गिकरित्या 'कफ' दोष वाढू लागतो. अशा वेळी आईस्क्रीम खाल्ल्याने कफ अधिक वाढू शकतो.
रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने सर्दी, खोकला, घसा खराब होणे किंवा सायनसचा त्रास होण्याचा धोका वाढतो.
रात्रीच्या वेळी मेटाबॉलिझम (Metabolism) मंद असते. यामुळे रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने वजन किंवा चरबी वाढू शकते.
आईस्क्रीम खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे 'दुपार'. या काळात शरीरातील जठराग्नी प्रबळ असतो, ज्यामुळे पचन व्यवस्थित होते.
आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेचच अतिशय थंड पाणी पिणे टाळावे. तसेच हिवाळ्यात आणि पावसाळ्यात रात्री आईस्क्रीम खाणे टाळावे.