Running After 40 | चाळीशीनंतर धावणे शक्य आहे का? तज्ज्ञांचे मत काय?

पुढारी वृत्तसेवा

वयाच्या चाळीशीनंतर धावण्यास सुरुवात करणे पूर्णपणे शक्य आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते योग्य पद्धतीने सुरुवात केल्यास आरोग्यदायी फायदे मिळू शकतात

मात्र, वय वाढल्यानंतर शरीराची पुनर्प्राप्ती क्षमता (recovery) कमी होत असल्याने नियोजनबद्ध आणि सावध सुरुवात करणे आवश्यक असते

जगभरात अनेक धावपटूंनी ४०, ५० आणि ६० वर्षांनंतरही अर्ध-मॅरेथॉन आणि पूर्ण मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केल्याची उदाहरणे आहेत

चाळीशीनंतर धावायला सुरूवात करण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि सातत्य आवश्यक असते

चाळीशीनंतर धावणे सुरू करण्यासाठी योग्य वैद्यकीय तपासणी, सराव, चांगला आहार आणि शरीराच्या क्षमतेचा आदर या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात

हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेही, स्थूलता, गुडघे किंवा कंबरेच्या सांध्यांचा त्रास असलेल्या व्यक्तींनी धावण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

अनेक वर्षे निष्क्रिय जीवनशैली असल्यास थेट धावणे सुरू करू नये, प्रथम चालणे, नंतर वेगवान चालणे आणि त्यानंतर धावणे अशी टप्प्याटप्प्याने सुरूवात करावी

पहिल्याच दिवशी ५ किंवा १० किलोमीटर धावण्याचा प्रयत्न करू नये, धावताना चांगल्या दर्जाचे रनिंग शूज वापरणे महत्त्वाचे आहे.

वय वाढल्यानंतर शरीराला पुनर्प्राप्तीसाठी अधिक वेळ लागतो. गुडघे, टाच, कंबर किंवा छातीत वेदना होत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

येथे क्लिक करा