Hair Care Tips | झोपताना केस मोकळे की वेणी घालावी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

पुढारी वृत्तसेवा

रात्री आरामदायी झोप मिळावी, यासाठी अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न असतो, की झोपताना केस मोकळे ठेवणे चांगले की वेणी घालणे?

झोपताना केस मोकळे ठेवणे चांगले की वेणी घालणे? ही सवय केसांची मजबुती, टाळूचे आरोग्य आणि झोपेची गुणवत्ता यावरही परिणाम करू शकते

केस तज्ज्ञांच्या मते, झोपताना केस मोकळे ठेवल्यास टाळूला मोकळेपणाने श्वास घेता येतो. त्यामुळे घाम आणि ओलावा साचत नाही

कोंडा आणि खाज येण्याचा धोका कमी होतो. तसेच केसांच्या मुळांवर ताण येत नसल्याने केस तुटणे आणि गळणे कमी होण्यास मदत होते

झोपेत सतत होणाऱ्या हालचालींमुळे केस उशीवर घासले जातात. त्यामुळे केस गुंतणे, गाठी पडणे आणि तुटण्याचे प्रमाण वाढू शकते

झोपताना हलकी आणि सैल वेणी घातल्यास केस गुंतण्यापासून वाचवते आणि विशेषतः लांब केस असलेल्या महिलांमध्ये केस तुटण्याचे प्रमाण कमी करते

झोपताना घट्ट वेणीमुळे टाळू आणि केसांच्या मुळांवर ताण येतो. केस गळणे, कपाळाजवळील केस मागे जाणे आणि डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते

झोपण्यापूर्वी केस पूर्णपणे कोरडे ठेवा, केसांची सैल वेणी बांधण्यासाठी मऊ स्क्रंची किंवा कापडी रिबन वापरा

केस घट्ट बांधून झोपणे टाळावे, साधारणपणे सैल वेणी किंवा हलके मोकळे केस ठेवून झोपणे हा अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय मानला जातो

येथे क्लिक करा