पुढारी वृत्तसेवा
IVF (In Vitro Fertilization) ही अपत्यप्राप्तीसाठी वापरली जाणारी वैद्यकीय प्रक्रिया आहे, ज्यात गर्भ शरीराबाहेर तयार केला जातो.
होय, तांत्रिकदृष्ट्या PGT (Pre-Genetic Testing) द्वारे भ्रूणाचे लिंग ओळखता येते.
भारतामध्ये PCPNDT कायद्यानुसार मुलगा किंवा मुलगी ठरवणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे.
नाही. भारतात डॉक्टरांना भ्रूणाचे लिंग सांगण्यास किंवा निवडण्यास कायद्याने मनाई आहे.
काही परदेशी देशांमध्ये वैद्यकीय कारणासाठी (जिनेटिक आजार टाळण्यासाठी) लिंग निवड मर्यादित स्वरूपात मान्य आहे.
“IVF मध्ये मुलगा हवाच” किंवा “मुलगी ठरवता येते” असे दावे भ्रामक आणि बेकायदेशीर आहेत.
IVF चा उद्देश निरोगी बाळाचा जन्म आणि अपत्यप्राप्ती आहे, लिंग निवड नाही.
लिंग निवड केल्यास डॉक्टर आणि पालकांवर गंभीर गुन्हेगारी कारवाई होऊ शकते.
डॉक्टरांचा स्पष्ट सल्ला आहे “मुलगा-मुलगी नव्हे, निरोगी बाळ महत्त्वाचं.”