Fever & Bath: ताप असताना अंघोळ करावी का... पाणी थंड की कोमट असावं?

Anirudha Sankpal

ताप असताना आंघोळ करणे सुरक्षित असते, मात्र आंघोळीसाठी नेहमी कोमट पाण्याचाच वापर करावा.

Fever Mouth Tastes | pudhari photo

अति थंड पाणी टाळावे, कारण त्यामुळे थंडी वाजून शरीराचे तापमान वाढू शकते.

cold water shower benefits body

तसेच अति गरम पाण्याने आंघोळ केल्यास डिहायड्रेशन आणि थकवा वाढू शकतो, त्यामुळे गरम पाणीही टाळावे.

कोमट पाण्याने आंघोळ केल्यास स्वच्छता राहते आणि शरीराला आराम मिळून ताप कमी करण्यास मदत होते.

जर तुम्हाला खूप अशक्तपणा, चक्कर किंवा डोकेदुखी जाणवत असेल, तर अशा वेळी आंघोळ करणे टाळावे.

ताप म्हणजे केवळ आजार नसून तो शरीरातील संसर्गाचा संकेत असतो, त्यामुळे केवळ तापमान कमी करण्यावर भर न देता विश्रांती घ्यावी.

भरपूर पाणी पिणे आणि सकस आहार घेणे तापाच्या स्थितीत अत्यंत आवश्यक आहे.

Drinking water habits

जर ताप २-३ दिवसांपेक्षा जास्त काळ टिकला किंवा त्रास वाढला, तर घरगुती उपाय करण्याऐवजी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

येथे क्लिक करा