पुढारी वृत्तसेवा
आयुर्वेदानुसार ग्रीष्म ऋतूमध्ये शरीरातील ऊर्जा कमी होत असल्याने दुपारची अल्प झोप लाभदायक ठरते
विशेषतः वृद्ध, लहान मुले, शारीरिक श्रम करणारे आणि अशक्त व्यक्तींना दुपारची झोप फायदेशीर ठरते
मात्र अति झोप टाळणे गरजेचे आहे. संतुलित झोप, पुरेसे पाणी आणि हलका आहार हेच उन्हाळ्यात आरोग्य टिकवण्याचे मुख्य सूत्र मानले जाते
दिवसा जास्त वेळ झोपल्यास आळस, डोकेदुखी, रात्रीची झोप बिघडणे आणि पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात
प्रौढ व्यक्तींनी उन्हाळ्यात दुपारी साधारण 20 ते 30 मिनिटे झोप घेणे उत्तम मानले जाते. खूप थकवा असल्यास जास्तीत जास्त 45 मिनिटांपर्यंत विश्रांती घेऊ शकता
1 तासांपेक्षा अधिक झोप घेतल्यास शरीर सुस्त होणे, रात्री झोप न लागणे आणि डोके जड वाटणे अशा समस्या होऊ शकतात
उन्हाळ्यात जेवणानंतर साधारण 30 ते 45 मिनिटांनी विश्रांती घ्यावी. दुपारी 1 ते 3 या दरम्यान घेतलेली झोप अधिक फायदेशीर मानली जाते
उन्हाळ्यात दुपारची झोप घेतल्यास शरीरातील उष्णतेचा ताण कमी, थकवा आणि अशक्तपणा कमी होऊन मेंदूला विश्रांती मिळाल्याने एकाग्रता वाढते, रक्तदाब नियंत्रणात राहतो
उन्हाळ्यात जड आणि तेलकट जेवण टाळा, झोपण्यापूर्वी भरपूर पाणी प्या, शक्य असल्यास हलके संगीत किंवा शांत वातावरण ठेवा, हवेशीर खोलीत विश्रांती घ्या