अंजली राऊत
भारतीय लोकांच्या घराघरांमध्ये वर्षांनुवर्षापासून लोखंडी कढईचा वापर केला जात आहे
लोखंडी कढईत शिजवलेले अन्न आरोग्यासाठी चांगले असते
ज्या लोकांच्या शरीरात आयर्नची कमतरता असते, त्यांच्यासाठी लोखंडी कढईत शिजवलेल्या अन्नातून आयर्न मिळते.
परंतु लक्षात ठेवा, काही भाज्या लोखंडी कढईत बनवणे टाळलेच पाहिजे.
लोखंडी कढईत टोमॅटो शिजवू नये, कारण टोमॅटो आम्लधर्मी असतो.
लोखंडी कढईत भाजी शिजवल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन भाजीचा स्वाद पूर्णत: बदलू शकतो.
लोखंडी कढईत पालक शिजवू नये. पालकात ऑक्झेलिक ॲसिड असते. पालेभाजीचा रंग बदलू शकतो आणि चवही बिघडण्याची शक्यता असते. बीट देखील लोखंडी कढईत शिजवू नका.