Iron Kadhai Cooking | लोखंडी कढईत चुकूनही शिजवू नका 'हे' पदार्थ

अविनाश सुतार

भारतीय घरांमध्ये अनेक वर्षांपासून लोखंडी कढईत अन्न शिजवले जाते

मोठ्या जेवणावळींमध्ये खास चवीसाठी लोखंडी कढई वापरली जाते

अन्नाची चव वाढवण्यापासून ते शिजण्याचा वेळ कमी करण्यापर्यंत आणि अन्नात लोखंडाचे खनिज मिसळण्यापर्यंत कढईचा उपयोग होतो

आरोग्यासाठी अनेक फायदे असले तरी काही पदार्थ लोखंडी कढईत शिजवू नयेत ते पदार्थ असे -

टोमॅटो

टोमॅटोमधील सिट्रिक ऍसिड (लिंबूवर्गीय आम्ल) लोखंडाशी प्रक्रिया करते व अन्नामध्ये धातूचा स्वाद पसरतो

लिंबू

लोखंडी कढईत लिंबू घातल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन धातूचा स्वाद येतो आणि ऍलर्जीही होऊ शकते. लिंबामधील आम्ल लोखंडाशी प्रक्रिया करते

गोड पदार्थ / मिठाई

हळवा, गनाश किंवा इतर गोड पदार्थ लोखंडी कढईत बनवू नयेत. कारण त्यात धातूचा स्वाद मिसळतो आणि संपूर्ण गोड पदार्थाची चव बिघडते

पास्ता / नूडल्स

मैद्यापासून बनवलेले पास्ता किंवा नूडल्स लोखंडी कढईत शिजवताना चिकटतात. धातूचा स्वाद लागल्याने पदार्थाची चव बिघडते व पोतही खराब होतो

मासे

मासे शिजवताना कढईला चिकटतात आणि त्याची चव व पोत खराब होतो. त्यामुळे मासे लोखंडी कढईत शिजवणे टाळावे

येथे क्लिक करा