पुढारी वृत्तसेवा
आयर्न (लोह) हे मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणारे महत्त्वाचे खनिज आहे
शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यात आयर्नची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते
या हिमोग्लोबिनच्या मदतीनेच रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जातो
मासिक पाळी रक्तस्रावामुळे आयर्नची कमतरता निर्माण होण्याचा धोका असतो
शरीरात आयर्नचे प्रमाण कमी झाल्यास आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात
सतत थकवा, अशक्तपणा, चक्कर, डोकेदुखी, श्वास फुलणे अशी लक्षणे दिसतात
कोणत्याही कामात मन न लागणे अशा समस्याही दिसू लागतात
डाळी, चणे, राजमा, सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या आहारात वापरावे
पालक, तीळ, सुकामेवा, अंडी, मासे, मटणद्वारे आयर्न सहज मिळू शकते