Iran Dancing missile |इराणच्‍या 'डान्सिंग मिसाइल'ने जगाचे डोळे विस्फारले! काय आहे खास..

पुढारी वृत्तसेवा

इराणची सरकारी वृत्तवाहिनी 'प्रेस टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने रविवारी अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या संघर्षात प्रथमच 'सेज्जिल' (Sejjil) क्षेपणास्त्राचा वापर केला.

सेज्जिल क्षेपणास्त्राला 'सज्जिल' किंवा 'अशुरा' या नावानेही ओळखले जाते. हे पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे दोन टप्प्यांचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.

इराणच्या जुन्या 'शहाब' मालिकेतील क्षेपणास्त्रांमध्ये द्रव इंधन वापरले जात असे, मात्र सेज्जिलमध्ये प्रगत घन इंधन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

'सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज' नुसार, हे मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून याची क्षमता साधारण २,००० किलोमीटरपर्यंत आहे आणि ते ७०० किलोपर्यंतची युद्धसामग्री वाहून नेऊ शकते.

हे क्षेपणास्त्र हवेत असताना आपली दिशा बदलू शकते याच वैशिष्ट्यामुळे याला "डान्सिंग मिसाइल" असे टोपणनाव मिळाले आहे.

इराणने १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला सेज्जिल यंत्रणेवर काम सुरू केले होते. २००८ मध्ये याची पहिली चाचणी झाली, ज्यात त्याने ८०० किलोमीटर अंतर कापले होते.

या क्षेपणास्त्राच्या विविध आवृत्त्या आहेत. सध्याच्या युद्धात वापरण्यात आलेले क्षेपणास्त्र 'सेज्जिल-२' असून यात प्रगत जीपीएस आणि इनर्शियल गायडन्स यंत्रणा आहे.

रिपोर्टनुसार, इराण आता ४,००० किलोमीटर पल्ला असलेल्या तीन टप्प्यांच्या 'सेज्जिल-३' ची चाचणी करत आहे.

येथे क्‍लिक करा.