पुढारी वृत्तसेवा
शेफ भरत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर साबुदाण्याची परफेक्ट खिचडी बनवण्याची पद्धत शेअर केली आहे.
सर्वात आधी १.५ कप साबुदाणा मोजून घ्या आणि पाण्याने २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्या.
धुतलेला साबुदाणा एका स्टीलच्या झाकणाच्या डब्यात (टिफिन) काढा.
यामध्ये ५ चमचे पाणी, १/२ चमचा साखर, १/२ चमचा सैंधव मीठ आणि १ चमचा साजूक तूप घाला.
कुकरमध्ये डब्याच्या अर्ध्या उंचीपर्यंत पाणी भरा. त्यात साबुदाण्याचा डबा आणि २ बटाटे ठेवा.
कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर फक्त ४ शिट्ट्या काढून घ्या.
प्रेशर पूर्ण निघाल्यावर डबा बाहेर काढून साबुदाणा प्लेटमध्ये काढा.
साबुदाण्यावर लगेच थंड पाणी टाका; यामुळे साबुदाणा अजिबात चिकटणार नाही.
अगदी १० मिनिटांत मोकळा-सटसुटीत साबुदाणा तयार! आता आवडीनुसार फोडणी देऊन खिचडीचा आनंद घ्या.