Ghee With Hot Rice Benefits : गरम भातात तूप का टाकावं? हे ११ फायदे ऐकून आजपासूनच खाणं सुरू कराल!

पुढारी वृत्तसेवा

गरम-गरम भातावर साजूक तुपाची धार! ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली सवय केवळ चवीसाठी नसून त्यामागे मोठे विज्ञान आहे.

आयुर्वेदातील 'चरकसंहिता' ग्रंथात दैनंदिन आहारात समाविष्ट करावयाच्या सर्वोत्तम पदार्थांमध्ये तुपाचा (घृत) अव्वल स्थानी उल्लेख आहे.

चरकसंहितेनुसार, तूप हे पचनक्रिया, बुद्धिमत्ता, आतड्यांचे आरोग्य, दृष्टी आणि श्वसनसंस्थेसाठी अत्यंत गुणकारी मानले गेले आहे.

आधुनिक विज्ञानानेही भात आणि तुपाच्या या समन्वयावर संशोधन केले असून, आयुर्वेदाच्या पारंपरिक दाव्यांवर शिक्कामोर्तब केले आहे.

भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, पण त्यात तूप मिसळल्यास ग्लुकोज रक्तामध्ये एकदम न मिसळता हळूहळू शोषले जाते.

'रिसर्चगेट'च्या अभ्यासानुसार, ३ महिने तुपासोबत शिजवलेला भात खाणाऱ्या ८६.४१% टाईप-२ मधुमेह रुग्णांच्या 'HbA1c' साखरेच्या पातळीत घट दिसून आली!

संशोधनानुसार, भातात तूप घातल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही, तर शरीराला हळूहळू आणि सातत्याने ऊर्जा मिळते.

तुपात नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन A, D, E आणि K मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराच्या सर्वांगीण पोषणासाठी आवश्यक आहेत.

तुपात 'ब्युटिरिक ॲसिड'सारखे फॅटी ॲसिड्स असतात. 'नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन'नुसार, हे घटका आतड्यांच्या पेशींसाठी उत्तम इंधन ठरतात.

भात आणि भाज्यांसोबत तूप खाल्ल्यास भाज्यांमधील 'फॅट-सोल्युबल' जीवनसत्त्वे (A, E, K व बीटा-कॅरोटीन) शरीर सहज शोषून घेते.

तूप पौष्टिक असले तरी त्यात कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे औषधासारखा रोज १ ते २ छोटे चमचे तूप खाणेच फायदेशीर ठरते.

येथे क्‍लिक करा.